आमदार राजळे यांना डावलून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावानांचा आक्रोश मेळावा संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येउन ठेपलेली असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांमधे उमेदवारी मिळवण्या वरून दुफळी निर्माण झाली आहे. भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना डावलून भाजपाची आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी हा निर्धार मेळावा असे नाव दिले असले तरी हा विद्यमान आमदाराच्या विरोधात निष्ठावानांचा आक्रोश ओकणारा मेळावा होता. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड हे होते. भाजपाने विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना उमेदवारी न देता ती भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांना द्यावी अशी या मेळाव्यात एकमुखी मागणी करण्यात आली.२०१४ साली राष्ट्रवादीतून आलेल्या आ. राजळे यांना पक्षाने उमेदवारी दिली.आम्हीही प्रामाणिकपणे दोनवेळा त्यांना निवडून आणण्याचे काम केले. पण त्यांनीच निष्ठावंत कार्यकर्ते संपवण्याचे काम केले असा जमलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रोश करीत आरोप केला.प्रारंभी शेवगाव शहरातील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अरुण मुंडे आणि युवा नेते गोकुळभाउ दौंड यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. मोठ्या पुष्पहारात सर्व असंतुष्ट कार्यकर्त्यांना गुंफण्यात आले. भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य म्हणाले की लोकप्रतिनिधींनी निवडनुकीत आमचा फक्त वापर करून घेतला. नंतर मात्र आम्हाला गेले दहा वर्षे डावलण्याचे काम या आमदारांनी केले असा आरोप करण्यात आला.गेली दहा वर्षे सत्ता उपभोगली पण आम्हाला कधीच निष्ठावंत म्हणून किंमत दिली नाही. गावच्या सरपंचापासून तर थेट आमदारकी पर्यंतचे सर्व पदे घरातच लागतात असाही आरोप यावेळी करण्यात आला.भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघाचे तिकीट निश्चितच बदलायला भाग पाडु असे वैद्य यांनी सांगितले.मढीचे सरपंच संजय मरकड यांनी ही आमदारावर जोरदार टीका केली.ते म्हणाले गेले पंचवीस वर्षे घरात आमदारकी असताना कारखाना सोडून एखादे वर्कशॉप तरी काढले का, आमच्या मढीला कासार पिंपळगावातून जलजिवन योजने अंतर्गत पिण्यासाठी पाणी येवू दिले नाही मग आम्ही तुम्हाला का मत द्यावी असा सवाल मढीचे सरपंच आणि कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी उपस्थित केला. गोकुळ भाउ दौंड यांनी सांगितले पक्षाने आम्हा दोघापैकी एकाला तरी उमेदवारी दिली पाहिजे. अरुण भाऊ मुंडे यांना दिली तरीही आम्ही त्यांचे काम करू आणि मला दिली तरीही मुंडे मलाच मदत करतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. परंतु पक्षाने जर विद्यमान लोकप्रतिनिधींना तिकीट दिले तर मग पक्षाचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले.यावेळी बाळासाहेब कोळगे,विलास फाटके, रमेश कांबळे,रामभाऊ पोटफोडे,संजय टाकळकर,शब्बीर शेख,बाळासाहेब पाखरे, बाळासाहेब सोनवणे यांनी आमदारावर प्रखर शब्दात टीका केली. नवनाथ ईसारवाडे,अर्जुन ढाकणे, उद्योजक भिमराव फुंदे, अंकुश बोके,भुषण देशमुख,अमोल सागडे,अंकुश कुसाळकर,दिगंबर काथवडे, पप्पू केदार,दत्तात्रय केदार, थाटेच्या सरपंच सौ. शितल केदार यांच्या सह शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले तर आभार गणेश कराड यांनी मानले. लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हा पराभव मराठा विरुद्ध वंजारी या वादामुळे झाला आहे. बीडमध्ये मराठा लाँबीने पंकजाताईचा पराभव केला. मग शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवार देण्यासाठी वरीष्ट पातळीवर हालचाली सुरू आहेत. म्हणून या भाजपच्या मेळाव्याला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार राजळे हे या बंडाळीला कशाप्रकारे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांना या मतदारसंघात राम लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधले गेले आहे.आणि तुषार वैद्य यांना हनुमानाची उपमा देण्यात आली आहे. भाजपच्या या पक्षांतर्गत दुफळीचे थेट देशपातळीवर पडसाद उमटले आहे.थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पक्षाने या मतदारसंघाची चांगलीच दखल घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here