नाशिक : १३ऑगस्ट १९९७. मी तेव्हा शाळेत होतो. नियमित वर्तमानपत्र वाचायचो.
” निर्माता , कॅसेट किंग गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या.” ही बातमी इतरांसारखी मी ही वाचली. तेव्हा विविधभारती वर सकाळी साडे आठ वाजता ” चित्रलोक ” हा कार्यक्रम लागायचा. त्यावर ” गुलशन कुमार अँड Super कॅसेट इंडस्ट्रीज की पेशकाश” या टायटल खाली अनेको नविन चित्रपट आले. कित्येक नवीन गायक, गीतकार आणि संगीतकार उदयाला आले. कालांतराने कळलं.
आज यशस्वी असलेली यातली ऐंशी टक्के माणसं त्या काळी गुलशन कुमार यांनी हेरून आणली होती.
कुमार सानू, नदीम – श्रवण, अनुराधा पौडवाल, सोनू निगम आणि कित्येक पॉप स्टार्स यांना पटावर आणायला गुलशन कुमार कारणीभूत आहेत. कित्येक गाजलेले चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली याला गणती नाहीच. सिनेसृष्टीला इतके कलाकार देणाऱ्या या पुण्यातम्याचा अंत इतका दुर्दैवी का व्हावा ?
दिल्लीतल्या दर्यागंज भागात ज्यूस विक्रेत्याच्या मुलगा गुलशन पुढे जाऊन भारतातल्या सगळ्यात मोठ्या कॅसेट कंपनीचा मालक आणि भारतातील सगळ्यात मोठा चित्रपट निर्माता होईल असं कुणाला त्याकाळी स्वप्नातही वाटलं नसेल. आपल्या वडिलांच्या दुकानाच्या बाजूलाच त्यांनी त्यांचं कॅसेट चं एक दुकान काढलं. तिथे कॅसेट आणि टेपरेकॉर्डर रेपैरींग ही ते करत. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हा व्यवसाय पुढे कित्येक दशकं सुरू राहणार आहे. स्वतःच्या आवाजात काही गाणी रेकॉर्ड करून त्याची विक्री केली नोयडा येथे जगप्रसिद्ध ” सुपर कॅसेट इंडस्ट्रीज” चा जन्म झाला. सुरुवातीला जुनी हिंदी गाणी नव्याने गाऊन त्या विकल्या गेल्या. नंतर गुलशन यांच्या लक्षात आलं की भारतात अध्यात्मशी निगडित संगीत क्षेत्रात फार काही काम होत नाहीये. घरातील प्रत्येकाने ऐकावं आणि प्रत्येक स्तोत्र ऐकावं ही त्यांची इच्छा त्यांनी फार डोकं लावून पूर्ण केली. अनेको भाषांमध्ये असलेले स्तोत्रे त्यांनी नवीन गायकांकडून म्हणून घेतली. त्यांचा हा प्रोजेक्ट सामान्य माणसानं अगदी डोक्यावर घेतला. गायत्री मंत्र , गणेश मंत्र , राम धून असे टायटल हातोहात विकले गेले. १९८३ साली सुरू झालेली सुपर कॅसेट इंडस्ट्री ही खऱ्या अर्थाने एक इंडस्ट्री झाली होती.
गुलशन कुमार यांना एक युक्ती ठाउक होती. चित्रपट रिलीज करायच्या आधी त्याची गाणी बाजारात आणायची. गाण्याचा व्यवसाय तेजीत आला. लोक गाणी बघायला खास टॉकीज मध्ये जाऊ लागले. हा प्रयोग त्यांनी ” लाल दुपट्टा मलमल का .” या चित्रपटापासून सुरू केला आणि नंतर भारतातील प्रत्येक कॅसेट इंडस्ट्री नी हाच ट्रेंड फॉलो केला जो आजही सुरू आहेच. ” लाल दुपट्टा मलमल का ” ची गाणी सगळीकडेच गाजली.
१९८८ साली अमीर खान आणि जुही चावला यांची भुमिका असलेला ” कायमत से कायमत तक” या चित्रपटाने गाणी आणि टॉकीज मध्ये इतिहास रचला. त्या काळी ऐशी लाख कॅसेट विकल्या गेल्या. आनंद मिलिंद यांचं संगीत, मजरुह यांची गाणी त्या काळी प्रत्येकाला अगदी पाठ झाली होती. सुपर कॅसेट इंडस्ट्री नी आपलाच इतिहास नव्याने रचला. ऐंशीच्या दशकातील सगळ्यात जास्त खपलेला हा अल्बम ठरला. १९९० हे वर्ष सुपर साठी सुपर डूपर ठरलं. गीतकार समीर पांडे ( गीतकार अंजान यांचे पुत्र ) आणि नवोदित संगीतकार जोडी नदीम – श्रवण यांच्या जोडीला नवीन गायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज लागला आणि ” अशिकी ” ची गाणी समोर आली. ट्रेंड तीच होती. आधी गाणी रिलिज झाली. ती इतकी गाजली की एकदा गुलशन कुमार यांनी महेश भट यांना सांगितलं की हा अल्बम फक्त संगीत अल्बम म्हणून राहू द्यायचा. नवोदित कलाकारांना घेऊन हा चित्रपट करून तो जर चालला नाही तर पुढचे चित्रपट आणि गाणी दोन्ही धोक्याच्या गर्तेत येऊ शकतात. असं ऐकण्यात आहे की महेश भट यांनी जबाबदारी घेतल्यावर हा चित्रपट रिलीज करण्यात आला. पुढे महेश भट आणि T Series, म्हणजेच सुपर कॅसेट इंडस्ट्री यांनी केलेली कामं गाजली. सडक, दील है के मानता नहीं आणि असे कित्येक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
१९८८ साली अमीर खान आणि जुही चावला यांची भुमिका असलेला ” कायमत से कायमत तक” या चित्रपटाने गाणी आणि टॉकीज मध्ये इतिहास रचला. त्या काळी ऐशी लाख कॅसेट विकल्या गेल्या. आनंद मिलिंद यांचं संगीत, मजरुह यांची गाणी त्या काळी प्रत्येकाला अगदी पाठ झाली होती. सुपर कॅसेट इंडस्ट्री नी आपलाच इतिहास नव्याने रचला. ऐंशीच्या दशकातील सगळ्यात जास्त खपलेला हा अल्बम ठरला. १९९० हे वर्ष सुपर साठी सुपर डूपर ठरलं. गीतकार समीर पांडे ( गीतकार अंजान यांचे पुत्र ) आणि नवोदित संगीतकार जोडी नदीम – श्रवण यांच्या जोडीला नवीन गायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज लागला आणि ” अशिकी ” ची गाणी समोर आली. ट्रेंड तीच होती. आधी गाणी रिलिज झाली. ती इतकी गाजली की एकदा गुलशन कुमार यांनी महेश भट यांना सांगितलं की हा अल्बम फक्त संगीत अल्बम म्हणून राहू द्यायचा. नवोदित कलाकारांना घेऊन हा चित्रपट करून तो जर चालला नाही तर पुढचे चित्रपट आणि गाणी दोन्ही धोक्याच्या गर्तेत येऊ शकतात. असं ऐकण्यात आहे की महेश भट यांनी जबाबदारी घेतल्यावर हा चित्रपट रिलीज करण्यात आला. पुढे महेश भट आणि T Series, म्हणजेच सुपर कॅसेट इंडस्ट्री यांनी केलेली कामं गाजली. सडक, दील है के मानता नहीं आणि असे कित्येक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नवोदित गायकांसाठी गुलशन कुमार यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केले. कुमार सानू यांना ‘ अशिकी ‘ मध्ये आणि सोनू निगम यांना ‘ बेवफा सनम ‘ मध्ये दिलेले ब्रेक दोघांसाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ” अच्छा सिला दिया ” आणि इतर सगळीच गाणी सुपर हिट झाली. त्यांच्या प्रत्येक दहा गाण्यांपैकी आहे पैकी सहा सात गाणी हमखास यशस्वी होत. कोणत्याही गायकाने दिलेलं आवाजाचं sample ते आवर्जून ऐकत. गरज असल्यास त्या गायकाला स्वतःच्या टीम कडून ट्रेन ही करून घेत आणि नंतर त्यांच्यासाठी अल्बम काढत. त्या काळी इंडी पॉप मध्ये नावाजलेली कित्येक नावं गुलशन कुमार यांनी ब्रेक दिल्याने आजही त्यांची ऋणी आहेत.
अत्यंत देवध्यानी असलेली ही व्यक्ती कर्मात खूप विश्वास ठेवत होती. अनेक अन्न छत्र आजही त्यांच्या नावाने सुरू आहेत. ज्या मंदिराच्या पायथ्याशी त्यांचा जीव गेला, अगदी काही दिवसापूर्वी त्यांनी तिथे टाइल्स बसवून बसण्याची व्यवस्था केली होती.
कित्येकांना पोटापाण्याला लावणाऱ्या गुलशन कुमार यांचा अंत धक्कादायक होता. त्याच महिन्यातील आठ नऊ तारखेची गोष्ट! त्यांना एक फोन आला. तिकडून दाऊद इब्राहिम याचा खास माणूस अबू सालेम चा आवाज आला. त्याने गुलशन यांच्याकडे दहा लाखाची खंडणी मागितली. त्याआधी त्यांची पूर्ण रेकी झाली होती. त्यांची पूर्ण दिनचर्या मारेकऱ्यांना ठाऊक होती. अंडरवर्ल्ड मुंबईत बांधकाम.व्यावसायिकांच्या नंतर आता चित्रपट क्षेत्रातील मोठ्या नावांच्या मागे लागलं होतं. गुलशन यांनी या धमक्यांना उडवून लावलं. नोयडा येथील बड्या उद्योगपतींच्या यादीत त्यांचं नाव असल्याने उत्तर प्रदेश पोलीस त्यांना सुरक्षा पुरवत होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांची सुरक्षा त्यांनी नाकारली होती ( ? ) .
१२ ऑगस्ट चा दिवस. नित्य नियमाने कामावर निघालेले गुलशन त्याचं मंदिरात दर्शन घेऊन आपल्या मारुती इस्टिम गाडीकडे येऊ लागले. हातात पूजेचं साहित्य होतं. एका इसमाने मागून येऊन त्यांच्या कानावर पिस्तूल रोखल. गोळी झाडली. गोळी त्यांच्या कानाला लागून गेली आणि त्या धक्क्याने ते खाली कोसळले. ते कोसळताच तिथे मोठा गोंधळ झाला. आधीच तयारीने आलेले अबू सालेम चे गुंड त्यांच्याकडे धावले. अश्यात गुलशनजींनी मदत घेण्यासाठी सरकत दोन घराचे दार ठोठावले. त्यांना बघण्यासाठी गर्दी करणारी जनता , दार लावून आत बसली. त्यांच्याकडे सरसावणाऱ्या गुंडांना रोखण्यासाठी त्यांच्या ड्राइव्हवरनी पूजेचा तांब्या त्यातील एकाला फेकून मारला. पण त्याच्याही पायाला दोन गोळ्या लागल्या. १९ गोळ्या अंगावर घेत या पुण्यातम्याने अर्ध्या तासाने कूपर हॉस्पिटलच्या वाटेवर जगाचा निरोप घेतला.
ही खरंच खंडणी साठी केलेली हत्या होती का ? इतकं यश , इतकी प्रसिध्दी कित्येकांच्या डोळ्यात खुपली असेल. त्या पैकी कुणी ? की आपलंच, रोजच्या उठण्या बसण्यातल ? गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर हिंदी चित्रपट सृष्टीवर अंडरवर्ल्ड च सुप्त अधिराज्य आणि भीती असल्याचं चित्र उघड झालं. त्याचसोबत त्यांचे आतपर्यंत असलेले लागेबांधे ही खोदून काढण्यात आले. कित्येक यशस्वी नावं समोर आली. यात कित्येक यशस्वी नाव समोर आली. पण पुरावे नसल्याने ते आज देशात आणि परदेशात मोकाट आहेत. त्यांनी नंतर कामंही केली, पैसाही कमावला. पण गुलशन यांच्या हत्येचं पातक त्यांच्या माथी उजळ राहिल. त्यांची सुटका झाली असली तरी नियतीनं त्यांची सुटका अजून केली नाहीये.
एक प्रतितयश संगीतकार , जो गाणी गायचा प्रयत्न करत असताना त्यांना गुलशन यांनी सल्ला दिला होता, ‘ तू गाणी गाऊ नकोस !. मैत्री खातर गुलशन यांनी त्याची गाणी प्रमोट केली खरी, पण श्रोत्यांनी ती सपशेल नाकारली. प्रमोशन करण्यात कसूर केल्याचा आरोप गुलशन यांच्यावर त्याने लावला. यासाठी त्याने अंडरवर्ल्ड ची मदत घेतली. गुलशन यांना खंडणी साठी आणि या संगीतकार जोडी पैकी एक असलेल्या संगीतकाराच्या गाण्याच्या प्रमोशन साठी धमक्या येऊ लागल्या. गुलशन यांनी त्याला दाद दिली नाही आणि शेवटी त्यांना जीव गमवावा लागला.
गृह खातं, पोलीस, केंद्र सरकार आणि इतर खाती आधीच अंडरवर्ल्ड वर करडी दृष्टी ठेवून होते. त्यात गुलशन यांची निर्घृण हत्या झाल्याने अनेक लोक देश सोडून पळाले. त्यात हा संगीतकार ही होता.
ही सगळी माहिती किती खरी किती खोटी हे त्या जितेश्र्वराला ठाऊक ज्याच्या पायथ्याशी त्याच्या भक्ताने प्राण सोडले. मनोरंजन एक पूर्णपुण्य मानलं जातं. या पुण्याच्या आड लोभ, मत्सर, पैसा आणि प्रसिद्धी आल्याने एका पुण्यातम्याला जिवानिशी जावं लागलं.
T Series आजही भारतात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारी संस्था आहे. गुलशन यांचे बंधू कृष्ण कुमार आणि त्यांचे पुत्र भूषण कुमार हे दोघं त्यांचा वारसा उत्तम चालवीत आहेत. आजही सुरुवातीला गुलशनकुमार यांचं नाव ते घेतात. तुलसी कुमार, त्यांची कन्या एक गायिका आहे. त्यांचा परिवार आजही एकत्र आहे. उगाच कोणत्याही भानगडीत त्यांचं नाव येत नाही. गुलशन यांचे धार्मिक कार्य ही तसंच सुरू आहे. कदाचित त्यांचं पुण्यफल म्हणून आजही TSeries लाखों कलाकारांना ब्रेक देते आहे.
अनुराग अनिल
9823903323