डी. के.दादा अन त्यांचे वंशज काही खास केल्याशिवाय कुणाचाही सत्कार करत नाही

0

मनमाड : डी. के.दादा अन त्यांचे वंशज काही खास केल्याशिवाय कुणाचाही सत्कार करत नाही,हे मला माहित आहे.पण आज माझा डी.के.दादांच्या वंशजानी सन्मान केला.म्हणजेच माझ्या हातून काही चांगले घडले आहे.असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
मनमाड येथील बौद्धजन उपासक संघाच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी आ.श्री.कांदे बोलत होते.व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,बबलू पाटील,शहरप्रमुख मयूर बोरसे,माजी सभापती किशोर लहाने,भाजप चे पंकज खताळ,संघाचे अध्यक्ष डॉ.जे.वाय.इंगळे,कार्याध्यक्ष अर्जुन साळवे,उपाध्यक्ष टी. एस.कांबळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कांदे म्हणाले की,मनमाड च्या जनतेने मतांचे दान माझ्या पदरात टाकले म्हणून आज माझ्या नावापुढे आमदार शब्द लागला आहे.आणि हे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही.असे ते शेवटी म्हणाले.
मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याचे ऐतिहासिक कार्य आमदार सुहास कांदे यांच्या हातून झाले,याची जाणीव ठेवत सदर संघाच्या वतीने गौरवपत्र देऊन श्री.कांदे यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार सुहास कांदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here