जवखेडेच्या कान्होबा यात्रेत थेट कुस्तीच्या फडातून प्रतापराव ढाकणे यांचे राजकीय डावपेच

0

अहमदनगर (सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी थेट कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजयदादा विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांच्यातच खरी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव ढाकणे हे आमदार निलेश लंके यांचे सारथ्य करीत आहेत.जवखेडे खालसा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ यांचे गाव आहे.भाजपाचे वर्चस्व असलेल्या गावात शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिरकाव केल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कान्होबा उर्फ (तांबुळदेव) यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.पैठण येथुन कावडीने पाणी आणून पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत मीरी रोडवरील कान्होबा उर्फ तांबुळदेवास जलाभिषेक करण्यात आला.रात्री संदल मिरवणूक, दुसऱ्या दिवशी मोठ्या तोफेच्या सलामीने शोभेच्या दारूच्या आतषबाजी करीत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमा नंतर सायंकाळी जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ आणि जेष्ठ उद्योजक शाबुद्दीनभाई शेख यांच्या हस्ते नारळ फोडून या हगाम्याची सुरुवात करण्यात आली.जिल्ह्यातील नामवंत पैलवान या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात उतरले होते.शेवटची कुस्ती ही पंधरा हजार रुपयांची झाली.कुस्तीत पराभूत झालेल्या मल्लांना परतीच्या प्रवासासाठी सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ साहेब यांच्या वतीने वीस, पन्नास, शंभर, दोनशे रुपये प्रवासखर्च देउन मल्लांना सन्मानित करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला हा यात्रा महोत्सव गावात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, हवालदार आजिनाथ बडे, पोलिस काॅंन्स्टेबल प्रल्हाद पालवे, नानासाहेब केकाण, यांच्यासह ६५ पोलीसांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता.या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जेष्ठ अॅडहोकेट लतिफभाई शेख, अॅडहोकेट वैभव आंधळे, अॅडहोकेट निसारभाई शेख, अनंत वाघ, पुजारी इसाकभाई शेख, सरपंच चारुदत्त वाघ, माजी सरपंच इरफान पठाण,सुरेश वाघ,ताजुद्दीन शेख, युवा नेते अमोल वाघ, मुस्ताक शेख, हरीभाऊ जाधव,नजमोद्दीन शेख, कैलास मतकर,राजमहंमद शेख,राजू आंधळे,नुरमहंमद शेख, जेष्ठ नेते पोपटराव आंधळे,फैरोज शेख, यांनी विशेष सहकार्य केले.छगन पानसरे सर यांनी धावते समालोचन केले.”हेल गुजारा”देउन या जंगी हगाम्याची सांगता झाली. जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या हजेरी मुळे कुस्त्यांचा जंगी हंगामा पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात पुरूषांची गर्दी झाली होती.तर छबिना मिरवणूकीत महीलांची गर्दी लक्षणीय होती.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here