नांदगाव : मी आपणास वचन देतो की पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा (पूर्णाकृती) पुतळा असेल : आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे सोबतच बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिले गेलेल्या साहित्यांचा समावेश असलेले लायब्ररी, तसेच पूर्णाकृती पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
रात्री 12 वाजता नांदगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, भीमसैनिक, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Home Breaking News पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा (पूर्णाकृती) पुतळा असेल : आमदार श्री....











