अॅडहोकेट लतिफभाई शेख,व महादेव आठरे यांच्या सह शेवगाव -पाथर्डी तालुक्यात पंचवीस नोटरींच्या नेमनुका

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”/ अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर ) भारत सरकारच्या विधी व न्याय विभागा मार्फत नोटरी कायदा सन १९५२ अंतर्गत संपूर्ण देशभर नोटरींच्या नेमनुका केल्या जातात.त्यासाठी केंद्र सरकारने ३१मार्च२०२३ पर्यंत सर्व राज्यातील वकिलां कडून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले होते.त्याच्या परिक्षा एप्रिल – मे २०२३ मध्ये घेण्यात आल्या होत्या. काही उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाखतींचा दुसरा टप्पा म्हणून त्यांना पुन्हा सहा – सात मार्च २०२४ रोजी संधी देण्यात आली होती.त्या पैकी शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील एकून पंचवीस वकिल ही परिक्षा पास झालेले आहेत.त्यांना दोन हजार रुपये फी भरल्याची पावती, दहावी पास चे प्रमाणपत्र,एल.एल.बी.चे प्रमाणपत्र, वकिल म्हणून नाव नोंदणी केली असल्याचे प्रमाणपत्र,बार कौन्सिल चे नोटरी म्हणून नियुक्ती साठी ना हरकत प्रमाणपत्र, आधार कार्डाची प्रत ही कागदपत्रे सादर करण्याची लिगल सेल ने विनंती केली होती.महाराष्ट्र राज्यासाठी नोटरी म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शेवगाव तालुक्यातील अॅडहोकेट मनोहर थोरात, रामदास बुधवंत, जयप्रकाश देशमुख,मिनानाथ देहाडराय,किरण अंधारे,तमिज पठाण, अभिजित काकडे, महेश आमले, अमोल वेलडे,आतिश लांडे, शिवाजी भोसले, संदिप बर्डे, आणि पाथर्डी तालुक्यातील अॅडहोकेट लतिफभाई शेख, महादेव आठरे, सुरेश आंधळे,भारत माने, अपर्णा वेलदे, विठ्ठल बडे, गणेश शिंदे,भारत गोसावी, नामदेव जायभाय,हरिहर गर्जे, आत्माराम वांढेकर, अनिल काटे, निलोफर इलियास शेख या एकूण पंचवीस वकिलांच्या शेवगाव -पाथर्डी तालुक्यातून नोटरी म्हणून नेमनुका केल्या आहेत. जमिनीचे साठेखत करणे,अॅफिडेव्हीट करणे,ही कामे नोटरी म्हणून नेमनुका केलेल्या वकिलांना करावी लागणार आहेत. लतिफभाई शेख हे जवखेडे खालसा येथील तर महादेव आठरे हे कौडगाव आठरे येथील रहिवासी आहेत.वरील पंचवीस वकिलांच्या “नोटरी पब्लिक” म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत या नवनियुक्त नोटरींवर अभिनंदनाच्या फुलांचे वर्षाव होत आहेत. सर्व सामान्य माणसाला निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन या नवीन नोटरी म्हणून नियुक्ती झालेल्या वकिलांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here