लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे

0

अहमदनगर (सुनिल नजन” चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) केंद्रातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्यात आले आहे.देशातील लोकसभेच्या आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी एक कमेटी स्थापून भारताच्या राष्ट्रपती सौ द्रौपदी मुर्मू यांना एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या कमेटीमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अध्यक्ष आहेत.”एक देश, एक निवडणूक” हा नारा देत या बाबतचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे.या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभा आणि दुसऱ्या टप्प्यात शंभर दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी शिफारस या अहवालात नमूद करण्यात आली आहे.त्यामुळे आता सगळीकडे संपूर्ण देशभर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.हा अहवाल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींना सादर करताना लोकशाहीचा पाया अधिक भक्कम व मजबूत होउन सामाजिक एकसंघता निर्माण होईल असे १८००० हुन अधिक पानांच्या गोषवारा अहवालात नमूद करण्यात आले आहे.हा अहवाल सादर करताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समवेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,अर्थ-वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के.सींग, सुभाष कश्यप, गुलाम नबी आझाद, आणि कायदा मंत्री अर्जुन मेघवाल हे उपस्थित होते.”एक राष्ट्र,एक निवडणूक “या राष्ट्रीय कमेटीने देशातील एकूण ६२ राजकीय पक्षाशी संपर्क साधला त्यापैकी ४७ पक्षांनी आपले मत नोंदवताना चांगला प्रतिसाद दिला.त्यातील ३२ पक्षांनी एकाच वेळी निवडणूका घेण्यासाठी च्या निर्णयाचे समर्थन केले तर १५ राजकिय पक्षांनी जोरदार विरोध केला.त्यामुळे विधानसभेच्या पुन्हा नव्याने निवडणुका घेतल्या जातील.व विधानसभा मुदतपूर्व लवकरच विसर्जित केल्या नसतील तर लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होई पर्यंत त्या सुरूच राहतील असे सांगितले गेले आहे.त्यामुळे आता दुसऱ्या फळीतील जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडणुका लढविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगात आता निवडणूक लढविण्याचे बळ संचारू लागले आहे.त्यामुळे संपूर्ण देशभर निवडणुकीची लगीनघाई सुरू झाल्यामुळे आता हवशे,नवशे,गवशे, अंगात उसने अवसान आणून धोतरफिटे पर्यंत जोमाने कामाला लागले आहेत.एकंदरीतच आता संपूर्ण देशभर निवडणुकीचा धुराळा उडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here