सुरगाणा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती सुरगाणा स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भावाडा ता. सुरगाणा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून उपस्थित महिलांशी संवाद साधला.यावेळी डॉ भारती पवार यांनी महिलांशी संवाद साधून महिलांना सक्षम करण्यासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर केंद्र व राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास होवून त्या स्वावलंबी होण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वतः सोबतच इतर महिलांची देखील उन्नती करून कुटुंबाला सक्षमपणे आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत व त्यांना आर्थिक बळ आणि योग्य बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे डॉ भारती पवार यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास मुन्नी ताई गावित, गावित सर, सोनवणे सर, गायकवाड सर,संदिप सौचे,गिरीजा ताई, आनंद पाटील, मधुकर चोथवा, पुष्पराज गावित, गणेश पवार, भास्कर जाधव,विलास पावरा,मोरे सर,कल्पना महाले सह मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची उपस्थिती होती.
Home Breaking News देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर...