विकसित भारत’चा संकल्प साध्य करण्यासाठी महिला शक्तीचा सहभाग महत्वाचा :- डॉ भारती पवार

0

राज्य : नारी शक्ती वंदन समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने मा नरेंद्रजी मोदी जी यांनी महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने देशभरातील महिलांना संबोधित केले. यावेळी दिंडोरी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी महिला शक्तीला संबोधन करतांना सांगितले की देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविल्या जात आहेत महिला भगिनींच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्यासाठी भाजपा नेहमीच प्रयत्नशील आहे.नारी शक्तीचा आणि महिलेचा खरा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला असून महिला सक्षमीकरण करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सरकारने सुरु केल्या आहेत त्याचेच यश म्हणून शेकडो महिला आज आत्मनिर्भर होत आहेत. यातून महिलांचा खरा विकास साधण्याचे काम झाले आहे.विकसित भारत चा संकल्प साध्य करण्यासाठी देशातील महिला शक्ती ही सर्वात मोठी हमी असल्याचे डॉ भारती पवार यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास श्याम मुरकुटे, उज्वला कोथळे – उगले, शर्मिष्ठा जोशी, भारती देशमुख, नीता भामरे, मंदा गायकवाड, आरती पवार, अश्विनी सोनवणे, अरुणा देशमुख, आशाताई कराटे, ज्योतीताई देशमुख, संध्या निरगुडे,सुरेखा गांगुर्डे, नम्रता काळे, निकिता गोसावी, रत्ना कोंबडे, सविता तलाखे, अमोल उफाडे, अमोल खोडे, संजय कदम, केशव हिंडे, मित्रानंद जाधव सह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here