खासदार सुजयदादा विखे यांच्या हस्ते पाथर्डी तालुक्यातील महिला बचत गटांना स्टाॅल व साहित्याचे वाटप

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला बचत गटांना स्टाॅल व साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या नियोजनातून महीला बचत गटांना चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील हिरकणी लोकसंचित केंद्र व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत हे साहित्य वाटप करण्यात आले.स्वयंरोजगार विक्री केंद्र,फुड प्रोसेसिंग युनिट, औजारे व बचत गटातील महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद व महाविंग यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आर्थिक सक्षम केले जात आहे.फुड प्रोसेसिंग युनिट साठी दहा टक्के रक्कम ही बचत गटांना भरावी लागत आहे.पण ती रक्कम बचत गटांना भरू न देता आम्ही व्यक्तीगत खर्चातून प्रत्येक बचत गटाचे चाळीस हजार रुपये भरले आहेत. बचत गटांचे पैसे भरण्याची ही दानत असावी लागते असा विरोधकांना टोला लगावत खासदार सुजयदादा विखे यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी महिलांना वार्षिक नियोजनातून चाळीस कोटी रुपये खर्च करून महिला बचत गटांना पैसे देण्यात येणार आहे असे ही खासदार विखे पाटील यांनी सांगितले.केंद्र सरकारने दुसऱ्या देशात कांदा निर्यात करण्यासाठी मार्च एंड पर्यंत कांदा निर्यातीसाठीची बंदी उठवली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे अशी माहिती खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी दिली.यावेळी अभयराव आव्हाड,म्रुत्युंजय गर्जे,अजय रक्ताटे, काशिनाथ पाटील लवांडे,प्रतिक खेडकर, अंकुश चितळे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ, अधिकारी, आणि बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here