राज्य :महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस जी यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीदरम्यान, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आदिवासी विकास मंत्री माननीय श्री अर्जुन मुंडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारकडून विविध केंद्रीय आणि राज्य प्रकल्पांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि अधिका-यांना योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री जनमन योजना, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, वनधन विकास केंद्र इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सचिव, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते,
Home Breaking News महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस जी यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य...








