अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोपरे येथे संत भगवान बाबा आणि संत वामन भाउ मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात ह.भ.प. अविनाश महाराज केदार,(भगवान गड),ह.भ.प.सोनाली नाईक (शेवगाव), आणि ह.भ.प. शिवाजी महाराज फुंदे(फुंदे टाकळी) यांच्या काल्याच्या किर्तनाने महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता झाली. शरद भताने, रणजित आव्हाड, आणि माका येथील भक्त मारुती सानप यांनी अन्नदान केले.ह.भ.प. शिवाजी महाराज फुंदे यांनी वै.संत वामनभाउ महाराज यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थित श्रोत्यांना भावनिक मुद्दे सांगून मंत्रमुग्ध केले. फुंदे महाराज म्हणाले पापी माणसांमुळे साधुंना त्रास होतो.साधु हयात आहे तोपर्यंत लोकांना कळत नाही.आणी ते गेल्यावर लोकांना प्रचिती येते.चंद्र सुर्य असेपर्यंत संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ यांचं नाव पुसणार नाही असे हे.भ.प.फुंदे महाराज यांनी सांगितले.श्रीमती सीताबाई धोंडीराम आव्हाड या आजीच्या संकल्पनेतून या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.परीसरातील आव्हाड -आंधळे परीवाराच्या आर्थिक मदतीने हा सोहळा गेल्या सहा वर्षापासुन संपन्न होत आहे.या सोहळ्यासाठी माजी सभापती संभाजीराव पालवे , माजी सरपंच रमेश आव्हाड, संजय आव्हाड, विजय आव्हाड, अर्जुन आंधळे, सुनिल आव्हाड,भरत आंधळे,कोंडीराम आंधळे,रामा आंधळे, अशोक आव्हाड, रामनाथ खेडकर, प्रल्हाद आव्हाड,सोपान उघडे, विष्णू उघडे, वसंत आव्हाड, शिवाजी उघडे, बबनराव आंधळे,छबुराव आंधळे, सुभाष आव्हाड, एकनाथ आव्हाड ,ह.भ.प. दत्तात्रय महाराज राजळे, सोमनाथ आव्हाड यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तगण हे मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.