आशाताई मुरकुटे जयहरी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महीलांना आत्मनिर्भर बनविनार!

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नेवाशाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सुविद्य पत्नी आणि माजी जिल्हापरीषद सदस्य सौ आशाताई मुरकुटे या जयहरी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील महीलांना आत्मनिर्भर बनविनार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.त्या भेंडा येथिल श्रीक्रुष्ण लाॅंन्समध्ये भाजपा नेवासा आणि जयहरी महीला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्य,रांगोळी स्पर्धा आणि हळदी कुंकू ईत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नमाला लंघे,भाजपच्या महिला नेवासा तालुका अध्यक्ष भारती बेंद्रे,शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मीरा गुंजाळ,ज्योती जाधव,मनिषा फुलारी,मंगल काळे,सोनाली क्षिरसागर, या उपस्थीत होत्या.या प्रसंगी डाॅ.सुभाष भागवत आणि डाॅ.रजनिकांत पुंड यांनी महीलांच्या आरोग्य विषयक समस्यावर व्याख्यान दिले.रांगोळी स्पर्धेत‌ अंताक्षरी सातपुते,भारती पुर्ण,सम्रुद्धी मिसाळ,श्रुतिका काळे,स्वाती गोंधन फुलारी,स्नेहल खाटीक,तसेच नृत्य स्पर्धेत शितल पाचरे,उर्मिला शिंदे,आदिती ईथापे,कांचन पवार यांनी बक्षिसे पटकावली.या स्पर्धेसाठी भाउसाहेब काळे,प्राचार्य संदिप फुलारी,लवकर मॅडम,डवले मॅडम यांनी रांगोळी स्पर्धेचे मुल्यमापन केले.नृत्य स्पर्धेसाठी गायिका ममता खेडेकर,प्रिया मनोहर,डाॅ.रजनिकांत पुंड, यांनी परिक्षण केले.विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम,आणि प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी नेवासा महिला भाजपा आणि जयहरी प्रतिष्ठानच्या महीलांनी विषेश परीश्रम घेतले.उपस्थीत महीलांचे जयहरी प्रतिष्ठान व मुरकुटे परीवाराच्या वतीने आभार मानन्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here