अहमदनगर (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग आणि अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती संतभुमी कला प्रतिष्ठानच्या कलापथकाद्वारे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे, तिसगाव आणि ईतर दहा गावात देण्यात येत आहे.जवखेडे खालसा येथे जाधव वस्तीवर समाज मंदिर परिसरातही संतभुमी कला क्रीडा प्रतिष्ठाने चांगली जनजागृती निर्माण केली. कलापथकातील गाण्याच्या माध्यमातून चांगले समाज प्रबोधन करण्यात आले आहे .पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध प्रबोधनकार प्रा.जनार्दन बोडखे, सुरेखा बोडखे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागासवर्गीय वस्तीतील श्रोत्यांना प्रबोधनात्म संदेश देत चांगलेच मंत्रमुग्ध केले.त्यांना हार्मोनियम वर चेतन सोनवणे आणि ढोलकीवर बंटी वडागळे यांनी चांगली साथ संगत केली.तर बंडू कराड, चैतन्य सांगळे यांनी रंगबाजी करत समाज कल्याण विभागा अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकिय योजनेची माहिती दिली.संतभुमी कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कलापथकाद्वारे केलेल्या समाज प्रबोधनातून आम्हाला चांगली माहिती मिळाली असल्याचे अनेकांनी सांगितले.पाथर्डी तालुक्यातील एकून बारा गावात हे समाज प्रबोधनाचे कार्य जोमाने सुरू झाले आहे.निवडुंगे,चिंचपूर पांगूळ,करोडी,पागोरी पिंपळगाव,चिचोंडी, हत्राळ,सुसरे, मोहोजदेवढे, माणिक दौंडी, चिंचपूर ईजदे या गावात हे समाज प्रबोधनाचे कार्य जोमाने सुरू करण्यात आले आहे.वरील गावातील जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.जनार्दन बोडखे यांनी केले आहे.