मनमाड : मनमाड शहर फटाका व्यापारी संघटनेच्या वतीने नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे, तालुक्याचे तहसीलदार, मनमाड शहराचे मुख्यधिकारी व मनमाड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात साहेब आदींना संघटनेचे अध्यक्ष जाफर मिर्झा यांनी निवेदन दिले व निवेदनात म्हटले मनमाड शहर व परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी निमित्ताने सिजनेबल (तात्पुरते) फटाका परवाना धारक व्यापारी संघटना विक्रेते आपणास विनंतीपुर्वक निवेदन करतो की, वरील विषयास अनुसरून यंदाही आम्हास दिवाळी निमित्ताने तात्पुरता फटाका स्टोल लावायचा आहे. परंतू मनमाड शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता नगरपालिकेच्या आजूबाजूला फटाका स्टोल, हातगाडीवर व काही दुकानात इतर लोक बेकायदेशीररित्या फटाका विक्री करतात व आम्ही फटाका व्यापारी संघटना शासनाच्या नियमानुसार तहसिल कार्यालयात जाऊन कागद पत्रांची पूर्तता करून परवाना घेऊन मनमाड नगरपालिकेचे एन.ओ.सी घेऊन सदर फटाका स्टोल लावत असतो.परंतु मनमाड शहरामध्ये बेकायदेशीररित्या फटाका स्टोल लावलेल्या दुकानाकडे कोणत्याही प्रकारचे परवाना किंवा नगरपालिकेची एन.ओ.सी घेतली जात नाही, तरी सदर व्यक्ती मनमाड शहरात बेकायदेशीररित्या फटाका व्यावसाय करीत असतात, त्याबाबत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही तसेच आम्ही फटाका व्यापारी संघटना योग्य त्या रितीने व परवाना घेऊन शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत असतो, तरी गावात लावलेल्या फटाका स्टोलमुळे (आर्थिक व जीवितहानी झाल्यास शासन जबाबदार राहील) आमच्या धंद्यावर फार मोठा परिणाम होतो, तरी मे. साहेबांना विनंती करतो की, आम्हास देखील एकात्मता चोंक, महात्मा गांधी चोंक, भाग्यलक्ष्मी बॅंकेजवळ, आझाद रोड, रेल्वे पुला जवळ व महालक्ष्मी चोंक या नमूद केलेल्या ठिकाणी फटाका विक्री करण्याबाबत परवानगी देण्यात यावी ही आम्हा सर्व गरीब व होतकरू, कष्टकरू व्यावसायिकांची कळकळीची विनंती आहे.तसेच निवेदनावावर संघटनेचे मार्गदर्शक अशोक मेगाणे, बाळासाहेब सुपेकर, राजेंद्र श्रीश्रीमाळ, कार्याध्यक्ष लक्ष्मण गोसावी, उपाध्यक्ष लक्ष्मण गवळी, खजिनदार इरफान खान, सचिव मनीष हिंगमीरे, यशवंत बाऊसकर, गोकुळ मेगाणे, दिलीप आहेर, विजय गवळी, मच्छिन्द्र सोनवणे, सुरेश जाधव, लक्ष्मण काळे, आशीष घुगे, भवानी परदेशी, श्याम घुगे, प्रवीण सानप, बिटू पगार, यश श्रीश्रीमाळ, रणवीर परदेशी आदींच्या सह्या आहेत.
Home Breaking News मनमाड शहरात बेकायदेशीर फटाका विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी-मनमाड शहर...