मीरीतील आमरण उपोशनास जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांचा जाहीर पाठिंबा, धनगर समाज उधळणार राज्यभर भंडारा

0

अहमदनगर : (सुनिल नजन-अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने सहा सप्टेंबर पासून उपोशन सुरू केले आहे. त्याच उपोशनास पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील विरभद्र (बिरोबा)मंदिरा समोर जेष्ठनेते राजूमामा तागड आणि बाळासाहेब कोळसे यांनी सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोशनाला जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा मिळत आहे.राज्यकर्त्यांनी गेली सत्तर वर्षे समाजाची फसवणूक केली आहे. तो अंन्याय आता समाज सहन करू शकत नाही. धनगर समाजाला सरकार जो पर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत “मरते दमतक” ,शरीरात जीव असेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोशनार्थी राजूमामा तागड आणि बाळासाहेब कोळसे यांनी व्यक्त केला आहे.तसेच मीरी-करंजी जिल्हा परिषद गटातील ३९ ग्रामपंचायतींनी या आमरण उपोशनाला जाहीर पाठिंबा असल्याचे ठराव दिले आहेत असे राजूमामा तागड यांनी सांगितले. अतिशय तातडीने भेट घेऊन राहुरीचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी मीरीतील आमरण उपोशनार्थी कडे सरकारचा एखादा प्रतिनिधी येणे आवश्यक होते पण तसे झाले नाही अशी खंत व्यक्त करीत धनगर समाजाला सवलती देउ असे सांगूनही काहीच लाभ मिळाला नाही म्हणून अहमदनगर येथील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगून या उपोशनाला जाहीर पाठिंबा दिला. शेवगाव येथील जनशक्ती मंचचे महासचिव जगन्नाथ गावडे पाटील यांनी आरक्षण न मिळाल्यास २०२४ च्या सार्वत्रीक निवडणूकीत सर्व मतदार संघात धनगर उमेदवार उभे करून प्रस्थापितांना समाजाची ताकद दाखवून देउ असे सांगितले. अहमदनगर जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नाना तागड ,अशोक होनमाने,बाबासाहेब तागड यांनीहीजाहीर पाठिंबा दिला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व माजी मंत्री आ.राम शिंदे यांनीही दोन दिवसात उपोषण स्थळी येउन भेटणार असल्याचे फोनवरून सांगितले. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे , माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे, राहुरी मार्केट कमेटीचे माजी उपसभापती अण्णा साहेब बाचकर,विनायक नजन सर,पांडुरंग गाडेकर,बाजीराव लेंडाळ, लक्ष्मण देवढे,सोन्याबापू गिरगुणे, विजय लेंडाळ, संतोष गुंजाळ, प्रकाश शेलार, भगवान दराडे, मयुर तागड, मीरीच्या सरपंच सुनंदा गवळी, माजी जिल्हा परीषद सदस्या उषाताई कराळे,भागिनाथ गवळी, नेवाशाचे प्रसिद्ध उद्योजक बापुसाहेब नजन,किशोर भुसारी, विठ्ठल चांगुलपायी,संभाजी पालवे, वैभव खलाटे,चारुदत्त वाघ,वैभव आंधळे, छगन पानसरे यांनीही प्रत्यक्ष भेट घेत उपोशनार्थींना पाठिंबा दर्शवीला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आता आक्रमक झाला असुन त्याचे पहीले रणशिंग अहमदनगर जिल्ह्यात सुरु झाल्यामुळे सर्व राज्यभर धनगर समाजाचे आक्रोश ,मोर्चे, आंदोलने, उपोषण, रास्ता रोको अशा शांततेच्या मार्गाने धनगर समाज एसटी आरक्षणाची मागणी करत आहे. चौंडी आणि मीरीतील उपोशनार्थीना काही धोका पोहोचल्यास भंडारा उधळून तोंडाला काळे फासण्याचा ईशारा ही धनगर समाजातील संतप्त झालेल्या काही आक्रमक नेत्यांनी दिला आहे. भिजत घोंगडे न ठेवता सरकारने तातडीने धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊन संतप्त समाजाला शांत करण्याची सर्व स्तरावरून मागणी होत आहे.नाही तर समाजाने उग्र स्वरूप धारण केल्यास त्याची झळ सरकारला बसल्या शिवाय राहणार नाही अशी चीन्हे सर्वत्र दिसु लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here