नांदगांव : जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला.या वेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी उपस्थित होत्या. समाज बांधवांतर्फे यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगतात यावेळी सर्वांना प्राणप्रतिष्ठा सुळे निमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्याला प्रत्येक दिलेला शब्द पाळला असून आणि यापुढेही आपल्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कुटुंबीय कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले. तांड्यावरील महिला भगिनींना खुशखबरी देत लवकरच महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला उद्योग सुरू करणार असल्याचे सांगितले.
Vआमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व बंजारा तांड्यांवर सभा मंडप उभारण्यात आले असून यामध्ये स्वखर्चाने संत सेवालाल महाराजांची मूर्ती भेट देण्यात आलेली आहे या सर्व मुर्त्यांचे प्राणप्रतिष्ठा आता करण्यात येत आहे. यावेळी बोलताना एन के राठोड यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले समाजाकरिता आमदार साहेब सतत अहोरात्र कार्य करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो तसेच बंजारा तांड्यांवर मोठ्या प्रमाणात अण्णांच्या माध्यमातून विकास झालेला असून समाजाला योग्य न्याय देणारा आमदार म्हणून अण्णांना आम्ही मानतो असे उदगार काढले या वेळी गणेश हिरामण चव्हाण ,,एन के राठोड,,आण्णा मुंढे, भाऊसाहेब चव्हाण भाऊलाल राठोड,संजय चव्हाण,,राऊसाहेब चव्हाण,, उपस्तीत कृ ऊ बाजार समिती सभापती बंडू पाटील ,सचालक आनिल सोनवने ,गुलाब पाटील भाऊसाहेब सुर्यवशी ,वि वि कार्यकारी जातेगाव चेरमन अंकुश पगारे,, व्हाईस चेरमन बाबू मानसिंग राठोड,, रामदास पाटील,,बाबुअल्ली शेख, तसेच हींगणे येथे पिंपरी हवेली सरपंच अनिल पवार उपसरपंच मानसिंग जेमा चव्हाण सदस्य राजेंद्र धर्मा राठोड रतन मानसिंग चव्हाण रामेश्वर चव्हाण, नायक सोमनाथ धनराज कारभारी सुदाम हरी चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,