अहमदनगर : (सुनिल नजन -अहमदनगर) राहुरी पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी मतदार संघाच्या शेवटच्या टोकाच्या कराडवाडी गावातील लोकांनी किती मते दिली याचा विचार न करता काल्याच्या किर्तनातच विविध विकास कामाचा तडाखा लाउन गावातील जनतेची मने जिंकली आहेत.डंबीर वस्ती साठी स्वतंत्र सिंगलफेज लाईट योजना,सटवाई दरा येथे मातीचा बंधारा,आणि मच्छिंद्रनाथ मंदिरा समोर सभामंडप ईत्यादी कामाचे भुमीपुजन करत गावातील हरिनाम सप्ताहात हजेरी लावून विकास कामाचा तडाखा च लावला आहे. गावातील लोक खाजगीत बोलताना तनपुरे शिवाय आम्हाला आता पर्यायच राहिला नाही असे सांगतात. ह.भ.प.मुरलीधर ढाकणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ह.भ.प.दिपक काळे, विष्णू लिंबोडीकर,गणेश तांदळे,रामदास रामदासी,बेलनाथजी महाराज, जगन्नाथ शास्त्री, डॉ. हरिदास पालवे, यांची किर्तने झाली. नंतर गावातील मुख्य रस्त्यावरून रथाद्वारे दिंडी प्रदक्षिणा ही काढण्यात आली होती. डोंगरवाडीच्या अडभंगीनाथ गडाचे महंत लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. लक्ष्मण कराड महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्राचे दाखले देत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.अंकुश टापरे यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्या साठी अर्जुननाना बुधवंत,पी.एस.आय सोमनाथ टापरे, चंद्रकांत गर्जे सर,बापु कुटे,सतिश मच्छिंद्र पालवे,सतिश टापरे, आंबादास टापरे, राजूशेठ बुधवंत, बाळू कराड,दत्तुबा हिरगुडे,ईश्वर बुधवंत, संभाजी गर्जे, बाबासाहेब टापरे,पोपट कराड,रमेश नाकाडे,आदिनाथ कराड,महादेव कुटे,भाउसाहेब ढाकणे, गणेश बुधवंत, भाउसाहेब केदार, सारंगधर गर्जे, विष्णु बुधवंत, सरपंच मंदाताई बुधवंत, उपसरपंच नितीन लोमटे, ग्रामसेवक संपत गोल्हार यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय राठोड यांनी केले. यावेळी जवखेडेचे सरपंच संदिप नेहुल यांनीही आमदार तनपुरे यांचा आवर्जून सत्कार केला.शिरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ही आमदार तनपुरे यांचा सन्मान करण्यात आला.








