नांदगांव : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज परधाडी येथील खारेओहोळ आदिवासी वस्ती वर भगवान वीर एकलव्य मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात आला असून या सभामंडपात या मूर्तीची स्थापना करण्यात आली.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून सर्व आदिवासी वस्तीवर सभामंडप देण्यात आले आहेत तसेच स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य यांची मूर्ती भेट देण्यात आली आहे.
सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदारांचे स्वागत करण्यात आले, या वेळी सभामंडप सजवण्यात आले होता.या वेळी बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित आदिवासी बांधवांचे आभार मानले, आपण मला मत दिले म्हणून मी आमदार आहे, आपल्या अडीअडचणी सोडवणे या साठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे असेही या वेळी त्यांनी सांगितले.या प्रसंगी माजी सभापती विलासभाऊ आहेर, राजाभाऊ जगताप, प्रमोद भाबड, किरण देवरे, किरण कांदे, भाऊराव बागुल, अनिल वाघ, रमेश काकळीज, सागर हिरे, जीवन गरुड, दीपक मोरे, सतीश येरंडे, जिभाऊ पवार, शिवाजी बच्छाव, नामदेव माळी तुकाराम गोंधळे नाना माळी वामन माळी दिलीप सोनवणे कृष्णा मोरे जगदीश मोरे राजू बन्सी रोहिदास माळी हरिश्चंद्र मोरे नारायण मोरे गणेश पवार ज्ञानेश्वर मोरे शांताराम माळी काळू माळी सागर एरंडे तुकाराम पोकळे संतोष गोंधळे शिवदास पवार शांताराम मोरे तुळशीराम माळी अजय माळी संदेश मोरे सुमा मोरे शंकर वाघ गोकुळ गांगुर्डे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.