नाशिक : २५० विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरण पूरक गणपती बाप्पा हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ रायगड चौक, सिडको शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत इ.१ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्नेहा नगरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुंदर गणेशमूर्ती बनवल्या. विशेष म्हणजे या कार्यशाळेत इ.१ ली व २ री च्या विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग तर होताच पण या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या बनवलेल्या मूर्ती विशेष लक्ष वेधून घेत होत्या. कार्यशाळा चालू असताना गणपती बाप्पा मोरया, डोक्यावर छत्री, गणपती बाप्पा मंत्री अशा विविध घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यशाळेत २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, वर्षा सुंठवाल, संध्या जाधव, किर्तीमाला भोळे, शैलजा भागवत, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.