Home Breaking News प्राण गेला तरी चालेल पण जो पर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही...

प्राण गेला तरी चालेल पण जो पर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही ,चोंडीतील उपोशनार्थी अक्षय शिंदे यांचा सरकारला ईशारा

0

अहमदनगर : (सुनिल नजन-अहमदनगर जिल्हा) केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत उपोशन मागे घेणार नाही असा ईशारा अहिल्यादेवीचे माहेरचे वंशज आणि चोंडीतील धनगर आरक्षणासाठी सहा सप्टेंबर पासून उपोशनाला बसलेले उपोशनार्थी अक्षयजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. नगर-सोलापूरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूरच्या विश्रामगृहात आरक्षणा संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर कार्यकर्ता शेखर बंगाळेंना मंत्र्यांच्या अंगावर भंडारा टाकला म्हणून सुरक्षा रक्षक आणि भाजपचा सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या कडून झालेल्या जोरदार मारहाणीचाही उपोशनार्थी कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला आहे. धनगरांचा भंडारा चालत नाही मग धनगरांची मते कशी चालतात असा सवालही उपोशनार्थीनी केला आहे.केंद्र सरकारने दिल्लीत होणाऱ्या १८ ते २२ या काळातील लोकसभेच्या अधिवेशनात जी आर काढून शासनाने त्वरित धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी उपोशनार्थींनी केली आहे.पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच आहे,भंडारा उधळणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही. चोंडीतील धनगर समाज आरक्षणा संदर्भात बसलेल्या क्रुतीसमितीच्या भावनाबद्दल सरकार संवेदनशील आहे असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झाला असून माळशिरस येथे झालेल्या बैठकीत रामहरी रुपनर हे महाराष्ट्रातून मोठे आंदोलन उभे करत आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्यातही आंदोलनाने पेट घेतला आहे. सुरुवात करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चोंडीतील उपोषण आंदोलनाचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे.चोंडीतील उपोशनार्थीच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे.भाजपचे मा.खासदार विकास महात्मे यांनी ही सोलापूरच्या बंगाळे मारहाणीचा जाहीर निषेध केला आहे. एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यांवर धनगर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आणि चोंडीतील उपोशनार्थी बाळासाहेब दोडतले, माणिकराव दागडे, अण्णासाहेब रुपनर,गोविंद नरवटे, सुरेश बंडगर, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळासाहेब गायके,चोंडीचे सरपंच सुनिल उबाळे, अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे, गणेश उबाळे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. सरकार नेमकी काय भुमिका घेणार याकडे संपूर्ण धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी उधळलेल्या भंडाऱ्याबाबद जे वक्तव्य केले त्याबाबत ही समाजाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here