Home Breaking News हिंदी हॉरर सिनेमा “नालंदा” लवकरच ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला .

हिंदी हॉरर सिनेमा “नालंदा” लवकरच ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला .

0

मुंबई, महालक्ष्मी (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे )
निर्माती संगिता शिवाजी किलेदार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच सॅप प्रॉडक्शनच्या पहिल्या वर्धापनदिननिमित्त सॅप प्रॉडक्शन निर्मित आणि अमर सुनिल पारखे लिखित आणि दिग्दर्शित नालंदा या हॉरर हिंदी सिनेमाचं स्क्रिनिंग नुकतंच फेमस स्टुडिओ, महालक्ष्मी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. याप्रसंगी ज्येष्ठ विनोदी अभिनेते,दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक विजय राणे, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, समाजसेवक खलील शिरगांवकर, चित्रपट दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, आदी मान्यवर उपस्थित होते. या हिंदी सिनेमांत संजीवनी जाधव, भूषण घाडी, महेश तेटांबे, भाविका सोनावणे, विक्रांत बोरकर, श्रुती फुलारी, परी माने, सागर माने आणि संदीप गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका असुन या सिनेमाच्या संकलनाची बाजू राज जाधव यांनी सांभाळली आहे, कार्यकारी निर्माता चैतन्य किलेदार असुन या सिनेमाचे कलर कॉम्बिनेशन सौरभ शिंगरे यांनी केले असुन संगीत साज निलेश प्रभाकर यांनी चढविला आहे. पोस्ट प्रॉडक्शन सागर सातपुते यांनी केले असुन प्रॉडक्शन व्यवस्थापन आशिष साबळे यांनी सांभाळले आहे. लवकरच हा हिंदी हॉरर सिनेमा प्रमुख ओटीटी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर पारखे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here