मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक शाळेत दहिहंडी उत्साहात

0

नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक, सिडको शाळेत गोपाळकाल्यानिमित्त दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. इ.१ ली ते ८ वी च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राधाकृष्णाची वेशभूषा केली होती. यावेळी इ. १ ली च्या चिमुकल्या राधाकृष्णांचा निरागस प्रेमभाव व ओसंडून वाहणारा आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दहिहंडिचे पूजन जेष्ठ शिक्षिका शोभा मगर यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर लगेचच गोविंदा रे गोपाला, आज गोकुळात रंग इ. गाण्यांवर विद्यार्थ्यांनी फेर धरत मनसोक्त नृत्याचा आनंद लुटला. विद्यार्थी गोविंदांनी थर रचत कृष्णाची वेशभूषा केलेल्या बालगोविंदाने दहिहंडी फोडली. दहिहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे किसन काळे, शोभा मगर, प्रमिला देवरे, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, संध्या जाधव, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, प्रविण गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here