गणराज आले धरतीवरती”भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण

0

भिरवंडे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
गणरायाचे थोड्याच दिवसात आगमन होईल.मुंबईकर चाकरमान्यांना गावी येण्याची ओढ लागलेली आहे.शहरापासून ते खेडोपड्यातून गणारायाच्या प्रतिष्ठानेनंतर गौराईच्या आगमनाचे वेध लागतात,तीच्या तयारीसाठी महिलांची धावपळ सुरु होते. ग्रामीण भागात तर घरोघरी गौरीपूजनाने टाळ-मृदुंग, फुगड्या,गौराई गीताने मोठ्या उत्साहात साजरा करतात.त्याच अनुषंगाने गौरी गणपतीच्या आगमनाप्रित्यर्थ भिरंवडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांनी “गणराज आले धरतीवरती” या’गणेश गौराई गीताचे’पारंपारिक वेशभूषेत उत्तम सादरीकरण केले आहे. गौराई गीतामध्ये टाळ- मृदुंगाच्या गजरात आरती,कळशी नृत्य,बस फुगडी,झिंम्मा-पिंगा नृत्य,सुप फुगडी,गौराई पुजन, गोल रिंगण,गौराई गीत असे विविध प्रकारचे नृत्याविष्कार या४०भिरवंडेकर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तल्लीन होऊन सादर केले.ही गीत श्रीकृष्ण यांनी गीत-संगीत ध्वनिमुद्रित केले आहे.गायिका अस्मिता सावंत, रंजना, सावंत, साक्षी सावंत,लोरी सावंत,सुप्रिया सावंत,विशाखा बेर्डे,उज्वला सुकाळी,ज्योती सावंत,विशाखा सावंत,यांच्या सुमधूर आवाजाने हे गीत शब्दबद्ध व श्रवणीय झाले आहे.डीओपी विजय तिवारी, प्रशांत जाधव,संतोष पांचाळ, तसेच सजावट अनिल मेस्त्री यांची आहे.तसेच ब्रि.माजी खासदार, शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर सावंत,भिरवंडेकर मराठा समाज मुंबई,प्रकाश(भाई)सावंत यांचे आभार.कल्याणी वाक्कर सहीत इतर सर्व महिलांनी सादर केलेले हे गणेश गौराई गीत व्हायरल होत आहे.गणेश भक्त या भिरवंडेकर महिलांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करत आहेत.या गीतासाठी श्रीकृष्ण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here