येवला : शिक्षकाची परस्पर प्रतिनियुक्ती, संतप्त पालकांचे गटविकास, गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन येवला तालुक्यातील पूर्वेकडील डोंगराळ भागातील राजापूर परिसरातील हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, गतिमान प्रशासनाने शाळेतील शिक्षकांस तोंडी आदेशाने इतर शाळेत पाठवले आहे. शालेय व्यवस्थापन समितीला या बाबत काही माहिती द्यावी असे वाटले नाही, इतर जबाबदारी आमच्यावर ढकलून दिल्या जातात मात्र या वेळी व्यवस्थापन समितीचा विसर पडला की काय ? मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांनी व ग्रामंचायत यांनी शाळेस 50000 रू खर्च करून तारेचे कुंपण, प्रिंटर,2led tv संच, पेव्हर ब्लॉक हे काम करून शाळेचा कायापालट केला त्या वेळी प्रशासनास कौतुक करायला वेळ मिळाला नाही परंतू आज 26 मुलांचे भवितव्य धोक्यात घालत तत्परता दाखविली या विरोधात संतप्त झालेल्या पालकांनी पंचायत समिती कार्यालय येथे शाळा भरवू व शाळेला कुलूप लावून मुलांना शाळेत न पाठवण्या बाबतचे निवेदन सादर केले आहे, सदरील निवेदनावर समाधान आव्हाड,दीपक सानप,शरद धात्रक,दिलीप धात्रक,नवनाथ आंबेकर,सुरेश वाघ,सोपान आव्हाड,समाधान दराडे,सुनील आव्हाड आदी पालक पर वर्गांनी सह्या केल्या आहेत,

Home Breaking News शिक्षकाची परस्पर प्रतिनियुक्ती, संतप्त पालकांचे गटविकास, गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन








