नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार: डॉ. भारती पवार

0

नाशिक : गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याकारणाने आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अध्यक्षतेखाली कांदा व्यापारी असोसिएशन, शेतकरी संघटनेची बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडली.
जो पर्यंत 40 टक्के शुल्क केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. मात्र आज झालेल्या या बैठकीत व्यापारी, शेतकरी संघटना यांच्या शंकेचे निरसन करत डॉ. भारती पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्यापासून कांदा लिलाव सुरू करणार असल्याची माहिती नाशिकच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी खंडू देवरे यांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. अखेर बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने डॉ.भारती पवार यांनी व्यापारी व शेतकरी संघटनेचे आभार मानले असून उद्या गुरुवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. सदर बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी,आमदार राहुल दादा आहेर, पणन मंडळ उपसरव्यवस्थापक एस.वाय. पुरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, एमडी नाफेड रितेश चव्हाण, ए. एम.डी नाफेड सुनील कुमार सिंग, एनसीसीएफ शाखा प्रबंधक एम परीक्षित, एनसीसीएफ इन्चार्ज सागर शर्मा,व्यापारी आघाडी अध्यक्ष खंडू काका देवरे, शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र शशिकांत भदाणे, शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन तात्या बोराडे,शंकरराव ढिकले,कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे, विजय बाफना, पंकज ओस्तवाल व संबंधित नेते, अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here