विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – डॉ. भारती पवार

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील ओझर येथे रस्ते, बंदिस्त गटारी, सभा मंडप आदि. कामांचे भूमिपूजन व घंटा घंटागाड्या आणि निर्मल्य कुंडांचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते पार पडले.मूलभूत सुविधा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने नागरिकांना शासकीय योजनेच्या विविध सुख सुविधा निर्माण करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव खेड्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या तर गाव खेड्याच्या नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.यावेळी शंकरराव वाघ, भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, श्रीकांत अक्कर, बापू पाटील,दिलीप मंडलिक, सारिका डेरले, सीईओ देशमुख साहेब ,तिवारी साहेब, नितीन जाधव, योगेश चौधरी,प्रशांत गोसावी, संजय गाजरे, किशोर कदम ,अल्पेश पारख ,रेखाताई अहिरराव, डॉ.एन. के. पाटील,रवींद्र घोडके, मंगेश दाभाडे आदींसह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here