गावाच्या विकासासाठी क्रेडाईचे काम कौतुकास्पद.. डॉ.भारती पवार

0

पिंपळगाव : पिंपळगावच्या विकासासाठी क्रेडाईने प्रयत्न करावे ,बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संस्था क्रेडाईची असून ती पिंपळगाव येथे असून या या शाखेच्या माध्यमातून पिंपळगाव शहराचा नकीच चेहरा मोहरा बद्दलत गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी क्रेडाईने काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.पिंपळगाव बसवंत येथे शगुण हॉल येथे क्रेडाईचा पद्ग्रहन सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी नामदार पवार ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.पुढे मंत्री पवार म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान म्हणतात की , देशाचा विकास हा गावाच्या विकासावर अवलंबून असतो त्यामुळे त्यांचा नारा चलो गाव की ओर असा आहे त्यामुळे गावच्या विकासाची पाय भरणी करायची असेल तर आपल्याला जास्त काम करावे लागेल त्यासाठी क्रेडाईने देखील गावाच्या विकासावर भर द्यावा आणि जीही मद्यत त्यांना लागेल त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी आमदार दिलीपराव बनकर, शंकरराव वाघ,भास्करराव बनकर, भागवतबाबा बोरस्ते, प्रमोद खैरनार,बापूसाहेब पाटील,अनंत राजेगावकर, मोतीराम पवार,जितूभाई ठक्कर,सुनील कोतवाल,दत्तात्रय निफाडे,अल्पेश पारख, प्रशांत घोडके,सुमित शिंदे, नितीन जाधव, योगेश चौधरी, राजेंद्र सोनवणे, शरद घोरपडे, हेमांगी पाटील,संदीप कुशारे ,संदीप कोचर,अनिल पूरकर,आनंद ढोकले, विलास झेंडफळे, गिरीश मोरे, विक्रांत मोरे, सुधाकर मेंगणे, शशिकांत जाधव, रफिक शेख, न्यायेश संघवी, देवेंद्र देशमाने, प्रीतेश छाजेड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here