कोरोना काळात केमिस्ट ची भूमिका महत्त्वाची:- डॉ. भारती पवार

0

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आमसभेचे उद्घाटन नाशिक येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या कार्यक्रमास आलेल्या प्रतिनिधींनी डॉ. भारती पवार यांनी संबोधन करतांनासांगितले की कोरोना काळात माझ्या भारतातल्या लोकांच्या काळजी, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने सर्व केमिस्टने आपल्या पूर्णतः रात्रंदिवस सेवा चालू ठेवल्या ज्या प्रकारे कोरोनाच्या काळात तुम्ही जी सप्लाय चेंज चालू ठेवली त्या तुमच्या सगळ्यांच्या भूमिकेबद्दल डॉ. भारती पवार यांनी भारत सरकारची प्रतिनिधी म्हणून कौतुक केले आणि आभारी ही मानले.डॉ. भारती पवार यांनी बोलतांना सांगितले की सगळ्या देशांनी भारताचे कौतुक केले की कोरोना सारखा संकट काळात भारताने आपल्या देशातचं नाही तर शंभर पेक्षा जास्त देशात मैत्रीच्या माध्यमातून कोरोना लस पोहोचवली हे आपले यश आहे त्याचा आपल्याला अभिमान वाटतो तसेच जगाने आपल्या फार्मा इंडस्ट्रीजचेही कौतुक केले.
आज भारताची ताकत अशी झाली आहे की आता आम्ही घेणारे नाही तर देणारे झालो आहोत 140 कोटी जनतेला भारताने व्हॅक्सिन आयात नाही केली तर ती इथं बनवली आणि आत्मनिर्भर भारताची व्हॅक्सिन 220 कोटी लोकांना देणारा एकमेव देश भारत हा जगाच्या पाठीवर ठरला आहे.यावेळी आप्पासाहेब शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट, अनिल नावंदर,अरुण बरकसे, मुकुंद दुबे, वैजनाथ जांगूव्हे,सुरेश आहेर, मदन पाटील, अतुल अहिरे, प्रसाद दानवे सह मोठ्या प्रमाणात केमिस्ट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here