Home Breaking News नाशिक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली...

नाशिक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२३ चा अनावरण सोहळा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित पार

0

नाशिक : नाशिक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२३ चा अनावरण सोहळा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित पार पडला.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२३ या पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळावे तसेच उद्योग करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी ही नियमावली तयार करण्यात आल्याचे यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी सांगितले. या नियमावलीद्वारे उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र हे देशाचा ग्रोथ इंजिन असून नाशिक जिल्ह्यात उद्योगासाठी भरपूर वाव आहे. पुरुषांप्रमाणे महिला देखील उद्योगक्षेत्रात मागे नाहीत, उद्योगामध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढला आहे ही नक्की समाधानाची बाब असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here