नाशिक : शासन आपल्या दारी’ या शासनाच्या लोकाभिमुख अभियानाचा कार्यक्रम नाशिक येथे आज राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्ह्यातील ७५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.यावेळी डॉ. भारती म्हणाल्या, अजितदादा यांनी आज वंदे भारत रेल्वे गाडीने प्रवास केला. यानिमित्ताने तुम्हाला देशातील एका उत्तम रेल्वेचा अनुभव आला. अशा २६ रेल्वेगाड्या देशात धावत आहेत. अशा प्रकारे भारताची भरारी सुरू आहे. जगभर त्याचे कौतूक होत आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत, जनतेला दिलासा देण्याचे काम सरकार उत्तम प्रकारे करीत आहे. २०१४ पूर्वी देशात महिला बचत गटांची संख्या काही हजारांत होती. आज ती संख्या नऊ कोटी कोटींच्या पुढे आहे. पूर्वी आम्हाला पन्नास हजार रुपये कर्ज मिळत होते आता वीस लाख मिळते आहे. महिला सबलीकरणाचे उत्तम काम सुरू आहे असे सांगितले.यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ,ग्राम विकास मंत्री श्री गिरीष महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री श्री उदय रविंद्र सामंत, शिवसेना नेत्या श्रीमती निलम गोऱ्हे, खासदार हेमंत गोडसे,आ. माणिकराव कोकाटे, आ.दिलीप बोरसे,आ.दिलीप बनकर ,आ.राहुल आहेर,आ.देवयानी फरांदे, आ.सीमा अहिरे,आ.सुहास अण्णा कांदे ,आ.नितीन पवार, आ.राहुल ढिकले, आ.सरोज अहिरे, आ.हिरामण खोसकर सह मान्यवर उपस्थित होते.









