मनमाड शहरातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा बसवण्या करिता आज शिवसेना शिष्टमंडळाने मनमाड शहर पोलीस निरीक्षक साहेबांची यांची भेट

0

मनमाड :  सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध समस्यांवर तात्काळ उपायोजना करणे संबंधित आज मनमाड येथील पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांच्याशी शिवसेना शिष्टमंडळाने चर्चा केली. शहरातील गेल्या अनेक दिवसापासून वाहन चोरी, चेन स्नचींग, मोबाइल चोरी खुप मोठ्या संख्येने घटना घडत आहे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे,पर्किग, वाहनाच्या कर्कश्य हॉर्न आवाज, वाहन जोरात चालवणे, कॉलेज तसेच महाविद्यालय परिसरात रोड रोमन ची संख्या जास्त असल्यामुळे याकडे बारीक लक्ष देणे, अशा विविध समस्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्या बाबत चर्चा केली,शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज या आधारे चोरांच्या माहिती हस्तगत करणे. चोरांचा लवकरात लवकर तपास करणे, रोड रोमिओन वर अंकुश आणणे तसेच विविध उपाय योजना करणे या विषयांवर शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली.सविस्तर चर्चेनंतर थोरात साहेबांनी सर्व उपायोजना तात्काळ राबविल्या जातील गस्त वाढविल्या जाईल तसेच शहरातील या सर्व समस्यांवर बारीक लक्ष ठेवले जाईल असे आश्वासन दिले.त्याप्रसंगी उपस्थित युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, लोकेश साबळे, युवासेना उपशहरप्रमुख मन्नू शेख, ऋषिकांत आव्हाड, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here