राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचे हित जपूनच संकटात सापडलेल्या जनतेला मदतीची खात्री देण्याचे काम केले – अजित पवार

0

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचे हित जपूनच संकटात सापडलेल्या जनतेला मदतीची खात्री देण्याचे काम कालही केले… आजही करत आहे आणि उद्याही करणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आज राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे कोरोना संकटाच्या काळात केलेल्या सामाजिक कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने सामाजिक बांधिलकीने नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात…जनावरांच्या छावण्यात पशुखाद्य असेल… पुरपरिस्थितीत अन्नधान्याचे वाटप असेल किंवा कोरोना काळात केलेले काम असेल. या ट्रस्टला अनेक दात्यांनी व स्वयंसेवी संस्थांनी मदत केली आहे त्या सर्वांना अजित पवार यांनी धन्यवाद दिले.
अजित पवार यांनी जुलै आणि अॉगस्ट महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे सांगितले. राज्यातील नागरिकांनी केंद्र व राज्यसरकार आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. जनतेने प्रतिसाद दिला नाही आणि मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगची उणीव राहिली तर फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीती व्यक्त केली.
राज्यातील शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित होता तो पवारसाहेब यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यावर मार्ग निघाला आहे. शिवाय आशा वर्कर्स यांचे प्रश्न आहेत. त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना संपावर जाण्याची वेळ महाविकास आघाडी सरकार आणू देणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
अनेक घटकांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदतीचा हात – जयंत पाटील
कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यावर अनेक घटकांची आर्थिक कोंडी झाली त्यांना मदतीचा हात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील लोककलावंत व नाटयसृष्टीतील बॅकस्टेजला काम करणाऱ्या कलाकारांना रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली तर कोरोना योध्दा, आशा वर्कर्स यांना फेशशिल्ड दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले. निकड व गरज असलेल्या लोककलावंतांचा शोध माजी आमदार लक्ष्मण माने यांनी घेतल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने दीड लाख फेशशिल्ड वाटप करण्यात आली आहेत. यासाठी पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, इंडियन मेडिकल असोसिएशन,व मार्डचे अध्यक्ष दिपक मुंडे यांनी सहकार्य केले.
रंगभूमीवर बॅकस्टेजला काम करणाऱ्या जवळपास दीड हजार कामगारांपैकी १२५० कामगारांना प्रत्येकी अडीच हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहेत. ६० हजार आशा वर्कर्सना फेशशिल्ड वाटप करण्यात आली. याशिवाय चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्हयात ५० लाख किमतीचे ५ हजार घरांचे लोखंडी पत्रे व दीड हजार ढापे देण्यात आले असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून घेतलेले निर्णय व काम सर्वांना कळावे शिवाय तीन महिन्यात ज्या लोकांना मदतीची गरज होती त्यासाठी पुढाकार घेऊन ही मदत केल्याचे पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी आमदार लक्ष्मण माने, अभिनेते शरद पोंक्षे, ट्रस्टचे विश्वस्त व माजी आमदार हेमंत टकले, मार्डचे अध्यक्ष दिपक मुंडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष कदम आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनेते शरद पोंक्षे, माजी आमदार लक्ष्मण माने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेच्या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे पत्रा भेट देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here