मनपा शाळा क्र.७१ मध्ये बालवारकरी दिंडी

0

नाशिक : 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१ मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांच्या बालवारकरी दिंडीचे खास आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करत दिंडित सहभाग घेतला. यावेळी शिक्षिका प्रमिला देवरे व शोभा मगर यांनी सजावट केलेली पालखी बालवारकरी यांनी खांद्यावर घेतली. तदनंतर बालवारकरी दिंडी शालेय परिसरातून विठूरायाच्या मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. विठूरायाचे मनोभावे दर्शन घेऊन शाळेच्या प्रशस्त मैदानात दिंडीचे आगमन होताच विद्यार्थ्यांचे रिंगण करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाच्या विविध गाण्यांवर, अभंगांवर फेर धरत रिंगण सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.शिक्षक-शिक्षिकांनीही विद्यार्थ्यांसमवेत रिंगण सोहळ्यात सहभाग घेत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.बालवारकरी दिंडीचे आयोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे, किसन काळे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, किर्तीमाला भोळे, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, प्रविण गायकवाड यांनी केले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here