Home Breaking News गोदावरी एक्सप्रेस मनमाड पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी

गोदावरी एक्सप्रेस मनमाड पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी

0

मनमाड : गोदावरी एक्सप्रेस मनमाड पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, मनमाड वरूनच, त्याच वेळेवर सुरू करण्यात यावी या विषयावर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्याशी चर्चा केली.नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड येथून हजारोंच्या संख्येने नोकरी, व्यवसाय तसेच विविध कारणांसाठी गोदावरी एक्सप्रेस ने प्रवासी जात असतात. म्हणून लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्य मंत्री, डॉ.भारतीताई पवार तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिळून बैठक लाऊन योग्य तोडगा काढू असे या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले. या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, तसेच मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, मनमाड नाशिक प्रवासी सेवाभावी संस्था मनमाड गोदावरी चा राजा बहुउद्देशीय चारिटीबल संस्था पदाधिकारी व प्रवासी सदस्य, नरेंद्र खैरे ,मुकेश निकाळे , राहुल शेजवळ, एडवोकेट निखिल परदेशी , संदीप व्यवहारे आदि बैठकीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here