तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे खाजगी सचिव शरद मरकड यांचा पहिला पगार कानिफनाथ चरणी अर्पण

0

 तेलंगाणा  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) महाराष्ट्रातून थेट तेलंगाणा राज्यात जाउन तेथील मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बनलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे(खोजेवाडी) येथील शरद मरकड या तरुणाणे आपला पहिला पगार मढीच्या कानिफनाथ चरणी आणि निवडुंगे गावातील गोडबोले महाराज चरणी अर्पण करून गावाला एक चांगला आदर्श निर्माण करत आपली समाजसेवेची आवड आणि देवावरील श्रद्धा कायम ठेवत आपल्या नवीन जिवनाची सुरुवात केली आहे. मा.खा. राजू शेट्टीच्या शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्या नंतर मरकड यांनी प्रभावित होउन थेट तेलांगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(kcr) यांचा दरवाजा ठोकत त्यांच्या “भारत राष्ट्र समीती”या पक्षात प्रवेश करण्याची ईच्छा प्रकट केली. शरद मरकड यांची शेतकरी संघटनेतील कामाची फाईल आणि दांडगा अनुभव पाहुन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव प्रभावीत झाले. आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राजकारण करण्यासाठी शरद मरकड याचा उपयोग करून घेण्याचे ठरवून मरकड यांना तेलांगणा राज्याच्या सर्व सवलती देत आपला खाजगी सचिव म्हणून नियुक्ती पत्र देत सरकारी कामावर हजर करून घेतले. पहिल्या महिन्याचा पगार थेट आपल्या मायभूमीत येउन कानिफनाथ चरणी अर्पण केला आहे.यावेळी निवडुंगे ग्रामस्थ आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भारत राष्ट्र समीतीचे प्रमुख संदिप राजळे यांनी मतदार संघाच्या वतीने शरद मरकड यांचा भव्य नागरी सत्कार केला. “पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा तिन्ही लोकी झेंडा”या संत वाड.मयातील पंक्ती प्रमाणे शरद मरकड यांनी आपल्या गावातील आई वडीलासह जिल्ह्याचे नाव उंचावत आपल्या उज्वल कारकिर्दीला सुरुवात केली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात शरद मरकड यांच्या नावाचा डंका त्यांच्या “भारत राष्ट्र समीती”पक्षाच्या वतीने “अबकी बार,किसान सरकार” नावाने वाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारत राष्ट्र समीती या पक्षाची घौडदौड वेगाने सुरू आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here