वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा.

0

त्र्यंबकेश्वर – ग्रामपंचायत हरसूल व वायघोळपाडा त्रंबकेश्वर नाशिक येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मा.भारती गेजगे यांनी हरसूल अंगणवाडी येथे भेट दिली.पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य यांच्या उपस्थित शालेय विद्यार्थ्यांची सायकल रॅली व प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी प्लास्टिकच्या 500 बॉटल मध्ये विविध बियाणे लावण्यात येऊन 25 पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.निसर्ग जपण्यासाठी प्रतिज्ञा ह्या वेळी घेण्यात आली.या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस, विद्यार्थी व एरियातील पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here