स्त्री शक्ती समाधान शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा :- डॉ. भारती पवार

0

पिंपळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज पिंपळगाव ता. निफाड येथे करण्यात आले.यावेळी डॉ. भारती पवार यांनी शिबिरासाठी उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली तसेच उपस्थित महिलांना त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. तसेच हा फक्त एक दिवसीय कार्यक्रम नसून महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांबाबत लाभ घ्यावा व आपल्या तक्रारींचे निसंकोचपणे मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे आणि शासकीय योजनांची माहिती पत्रकाद्वारे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकां पर्यंत पोहचवावी जेणेकरून महिलांना त्याचा लाभ घेता येईल असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.या शिबिरात महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली यावेळी मा. आ. दिलीप काका बनकर, भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, सतिष मोरे, बापू पाटील, अल्पेश पारख, पवन जाधव, दिगंबर मोहिते, माळी नाना, सारिका डेरले, कविता ताई पगार,प्रशांत गोसावी तसेच तहसीलदार श्री. घोरपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. दुसाने, CDPO आरती गांगुर्डे, BDO महेश पाटील, THO सुजित कोशिरे, PI पवार, श्री राहाटे आणि महिला पदाधिकारी अंगणवाडी सेविका व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here