येवला तालुक्यातील ग्रामपंचायत धुळगाव येथे अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0

येवला : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत धुळगाव येथे अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करत गावातील कर्तबगार ,सामाजिक गोग्दान देणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला सरपंच रामदास इंगळे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड, माजी सरपंच योगेश गायकवाड यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती देत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ज्या महिलांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू ,आर्थिक दुर्बल व पीडित घटकातील कुटुंबांना वेळप्रसंगी मदत करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा म्हणून शासनाच्या निर्णयाच पालन करीत येथील वाल्हूबाई जगताप व वैशाली गायकवाड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मान चिन्ह व सन्मान पात्र तसेच शाल देऊन सन्मानाने गौरव करण्यात आला यावेळी सूत्रसंचलन दत्तू गायकवाड,
यांनी केले यावेळी सोमनाथ गायकवाड,जनार्दन सोनवणे,सरपंच रामदास इंगळे,योगेश गायकवाड,दशरथ माळी,मंगेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, नारायण बारहाते,सुनिल शिंदे, चेतन गायकवाड, उल्हास गायकवाड, प्रविण गायकवाड,
आदी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here