ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, कारखाना शाखा अतिरिक्त मंडळची कार्यकारिणीची त्रिवार्षिक निवडणूक असोसिएशनच्या कार्यालय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, कारखाना शाखा अतिरिक्त मंडळची कार्यकारिणीची त्रिवार्षिक निवडणूक असोसिएशनच्या कार्यालय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सदर निवडणूक निवडणूक अधिकारी संदीप पगारे, सागर साळवे यांनी अत्यंत लोकशाही पद्धतीने राबविली.निवडणूक कार्यक्रम नुसार दि.२३/०५/२३ रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.अंतिम तारीखेपर्यत 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते,माघारी तारखे पर्यंत तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्यामुळे निवडणूक अधिकारी संदीप पगारे व सागर साळवे यांनी उर्वरित पाच उमेद्वारांना उमेदवारांना एका पदासाठी एक अर्ज शिल्लक राहिल्या मुळे खालील उमेदवार बिनविरोध विजयी घोषित केले.यामध्ये अध्यक्ष:-सतिषभाऊ केदारे, सचिव:-प्रविण अहिरे, कार्याध्यक्ष:-किरण अहिरे, अतिरिक्त सचिव:-सागर गरुड खजिनदार:-संदिप धिवर यावेळी असो चे वरिष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थ जोगदंड, माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, उपाध्यक्ष दीपक अस्वले, कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे उपाध्यक्ष कल्याण धिवर, संचालक राकेश ताठे प्रेमदिप खडताळे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड चे सचिव किरण वाघ, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सुभाष जगताप, सुनिल सोनवणे, संदिप पगारे, हर्षद सुर्यवंशी, सचिन इंगळे, फकिरा सोनवणे, विनोद खरे,शरद झोंबाड, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, खजीनदार साईनाथ लांडगे,नदिम सैय्यद राहुल शिंदे, मनोहर अहिरे, संजय केदारे, नितीन केदारे, पंढरीनाथ पठारे, विशाल त्रिभुवन, दिपक राऊत, रविंद्र पगारे, प्रशांत निकम, गौतम एळीजे, रुपेश साळवे,बबन कसबे, हनुमान अहिरे, मनिष कासवटे, धम्मदिप पखाले, प्रभाकर निकम, गुलाब वैरागर, अभ्युदय बागुल, वरुन म्हस्दे, प्रशांत मोरे, गणेश केदारे, संतोष सावंत, राजेश जगताप, सुमित अहिरे, निखिल सोनवणे, संतोष गायकवाड विशाल घोडके, गणेश वेन्नल्लु, विलास कराड, विकास अहिरे, किशोर वानखेडे, राजेंद्र सोनवणे, केतन गवळी, अर्जुन बागुल आदी पदाधिकारी व सदस्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here