सामुदायिक विवाह सोहळा अतिशय स्तुत्य उपक्रम :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0

धुळे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज लोहार समाज मंगल प्रतिष्ठान आयोजित लोहार समाज सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.लग्नसोहळ्यातील अवाजवी खर्च टाळण्याच्या दृष्टीने विचार केल्यास सामुदायिक विवाह सोहळा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून नव वधू वरांच्या आयुष्यातील विवाह हा अत्यंत महत्वाचा टप्पा आज संपन्न होतो आहे याचे समाधान वाटत असल्याचे याप्रसंगी डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले व नवदाम्पत्यांना वैवाहिक जीवनाच्या तसेच या आदर्श उपक्रमाबद्दल बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष प्रशांत रमेश लोहार,उपाध्यक्ष श्री. विलास रमेश सांगोरे,कार्याध्यक्ष युवराज मुरार जाधव,सचिव श्री. चंद्रकांत मयाराम कुकावलकर,खजिनदार श्री. गोपाल बाबुराव मकवान,नव वधू-वर, नातेवाईक, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here