
दिंडोरी : दि. २४.०५.२०२३ रोजी दिंडोरी येथील अंगणवाडी क्र.7 येथे राजश्रय फाउंडेशन व बालविकास प्रकल्प नागरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालविकास प्रकल्प अधिकारी मा.अजय फडोळ व प्रभारी प्रकल्प अधिकारी मा.वाकडे सर ह्यांच्या मार्गदर्शना खाली व मुख्यसेविका श्रीमती सुज्ञा खरे, शितल गायकवाड व मयुरी महिरे मॅडम यांच्या सुचना नुसार 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस ह्या साप्ताहिक कार्यक्रमासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.मासिक पाळी विषयी महिलांना असलेले समज गैरसमज ह्यावर हसत खेळत प्रश्नमंजुषा द्वारे डॉ. दिपक खाडे सर ह्यांनी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले,स्वच्छतेचं महत्व व मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी ह्या विषयी सुंदर मार्गदर्शन केले, *या दरम्यान महिलांना राजाश्रय फाउंडेशन मार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले.* कार्यक्रमास राजश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ ज्ञान राजे, सचिव राजश्री देसले प्रकाश देशमुख तसेच बालविकास प्रकल्प नागरी नाशिक च्या पेठ,सुरगाणा दिंडोरी येथील सर्व सेविका मदतनीस ताई व परिसरतील महिला व युवतीउपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेविका ज्योतीताई देशमुख व सर्व सेविका मदतनीस ताई यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नपूर्णा अडसुळे यांनी केले.
