केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मुंबईत G20 आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीला संबोधित

0

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मुंबईत #G20 आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीला संबोधित केले.या बैठकी दरम्यान असुरक्षित क्षेत्र ओळखून तिथल्या संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनात “ओळख आणि सुधारणा” याच्या महत्त्वावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. “ऑपरेशन दोस्त” अंतर्गत भूकंपाच्या वेळी मदतीचे उपाय पुरवणे असो किंवा “लस मैत्री” उपक्रमांतर्गत जवळपास 98 देशांना कोविड 19 प्रतिबंधक लस पुरवणे असो, “वसुधैव कुटुंबकम्” च्या तत्वज्ञानावर पंतप्रधानांचा विश्वास हा आपल्यासाठी मार्गदर्शक घटक आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here