श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे समर्थ हनुमान मंदिराचा कळसरोहण व धर्म ध्वज उभारणी सोहळा संपन्न!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथिल नव्याने बांधलेल्या हनुमान मंदिराचा कळसरोहन आणि धर्मध्वज उभारणी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेरमन व माजी आमदार शिवाजी कर्डीले, नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भेंडा येथील नागेबाबा फर्निचर अँड माँल इंडस्ट्रीज उद्योग समुहाचे मालक बापुसाहेब नजन,आव्हाने येथील गणपती देवस्थानचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, ह.भ.प.दिनकर महाराज आचवले,राम महाराज झिंजुर्के,व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे, नगरकर महाराज,हेआवर्जून उपस्थित होते. वैकुंठवाशी परमपूज्य माधवस्वामी यांनी या मंदिराच्या पायाभरणीची सुरुवात करुन दिली होती.मंदिर उभारणी चे त्यांचे स्वप्न आज साकार झाले आहे. आकरा कोटी रुपये खर्चाच्या मंदिराचा कलश उभारणीसाठी गावातील सासरी गेलेल्या मुलींनी प्रत्येकी पाच हजार रुपये दान करून कळसासाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे. या पाचही कळसाची गावातून सवाद्य मिरवणूक ही काढण्यात आली होती. यासाठी पुण्यातील खास झांज पथकाला आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी समर्थ हनुमान देवस्थानचे सचिव सुभाष बर्डे यांनी प्रास्ताविकात मंदिराच्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला. तर देवस्थानचे अध्यक्ष प.पू. रमेशअप्पा महाराज यांनी हे मंदिर भारतातील एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल अशा प्रकारचे काम करण्यात येणार आहे तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे,पोलिस काँन्स्टेबल अमोल कर्डिले, पो.काँ.अनिल बडे यांच्यासह गावातील स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला.एकनाथ आटकर,वैभव खलाटे,बंडू पाठक,चारूदत्त वाघ यांच्या सह संपूर्ण देश विदेशात असलेले भाविक भक्तगण या सोहळ्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here