शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेती क्षेत्रातून प्रगती करावी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0

नाशिक : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समर्पक उत्तर मिळावीत तसेच शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या डॉक्टर किसान मोबाईल ॲप्लिकेशन चे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आले डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड या कृषी क्षेत्रात काम करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादन वाढ करणे तसेच नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेतर्फे निर्माण करण्यात आलेल्या डॉक्टर किसान मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन व 31 प्रगती प्रगतिशील शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्काराचे वितरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला मार्गदर्शन कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हवामानाविषयी माहिती रोगप्रतिबंध खते कीटकनाशक इत्यादी विषयी माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे कार्यक्रमाला आमदार राहुल ढिकले,आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे पाटील, संस्थेचे संचालक सुनील दिंडे,गणेश धात्रक, साधनाताई जाधव, रवींद्र निमसे, संजय जाधव, अशोक अपसुंदे, नरेश भाऊ पाटील, दत्ताभाऊ खेमकर,योगेशभाऊ पाटील, विलास मामा कटारे, सुनील दिंडे,सागर पवार, प्रशांत दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here