
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) अतिशय चुरशीच्या झालेल्या आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाथर्डी मार्केट कमिटीच्या सभापतीपदी भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांचे खंदे समर्थक आणि हनुमान टाकळी सोसायटीचे चेरमन सुभाषराव बर्डे यांची निवड झाल्या बद्दल श्रीक्षेत्र हनुमान टाकळी ग्रामस्थांच्या वतीने बर्डे यांचे गावात वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले.सभापती पद हे हनुमान टाकळी गावाला मिळाल्याने गावाचे नाव उंचावले आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. नुतन सभापती सुभाषराव बर्डे हे मार्केट कमिटीच्या निवडनुकीत सहकारी सोसायटीच्या सर्व साधारण गटातून 620 मते मिळवून विजयी झाले होते. तर उपसभापती निवड झालेले कुंडलीकराव गणपत आव्हाड हे व्यापारी आडते गटातून 237मते मिळवून विजयी झाले होते. मार्केट कमिटीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बर्डे आणि आव्हाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब मोर्तब झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा आमदार राजळे यांनी झोपडीवर सन्मान सोहळा साजरा करत भावी कार्यास सुभेच्छा दिल्या.कोपरे व हनुमान टाकळी ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतषबाजीत आणि तोफांच्या सलामीत ढोल ताषाच्या गजरात आणि दिंडी मिरवणुकीने नवनिर्वाचित सभापतीचे जोरदार स्वागत केले.सुभाषराव बर्डे यांची पाथर्डी मार्केट कमिटीच्या सभापती पदी निवड झाल्यामुळे आता रिक्त होणाऱ्या हनुमान टाकळी सोसायटीच्या चेरमनपदी आता कोणाची वर्णी लावायची याबाबत मात्र हनुमान टाकळी सोसायटीच्या संचालक मंडळात थिणगी पडत सत्ता संघर्षाला आता पासुनच गुप्त पद्धतीने खलबते करीत सुरुवात झाली आहे.आता हनुमान टाकळी सोसायटीच्या चेरमनपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे टाकळी कोपरे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सहकारात एकाच व्यक्तीला दोन सहकारी संस्थेच्या प्रमुख पदावर राहता येत नाही हा सहकार खात्याचा नियम आहे.त्यामुळे बर्डे यांना एकाच पदावर काम करावे लागणार आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
