
येवला : मा. ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवला येथे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी डॉ. भारती पवार यांनी बोलतांना सांगितले की आता केंद्र सरकारने देखील राज्यांना सूचना केल्या आहेत की जिथे जिथे शक्य आहे तिथे तात्काळ कॅम्प आयोजित करा स्क्रीनिंग करा व ज्यांना गरज आहे त्यांचे ऑपरेशन्स करून घ्या.तसेच अंधत्वाचं प्रमाण वाढू नये म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत राज्य सरकार देखील वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प चे आयोजित करत आहेत तसेच उपजिल्हा रुग्णालय,पीएमसी,डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल वेगवेगळ्या ठिकाणी ही पेशंटला स्क्रीनिंग करून जिथे गरज आहे तिथे पेशंटला तात्काळ मदत केली जाते मोतीबिंदू सर्जरी फ्री व्हावी म्हणून सरकारने पूर्णपणे अनुदान दिलेले आहे माझी एवढीच विनंती आहे की आपण सुद्धा याचा जनजागर करा ज्यांना अडचणी असतील त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधा असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी आनंद शिंदे,राजू परदेशी,डॉ.नंदकुमार शिंदे, तरंग गुजराती, कृष्णा कवात,समीर समदाडिया,धनंजय कुलकर्णी,श्रावण जावळे, संगीता दिघे, बाळासाहेब, युवराज पाटोळे,नानाभाऊ लहरे,दत्ता सानप,संदीप मुरकुटे, बंटी धवे, गणेश गायकवाड, संतोष काटे,संतोष बेंद्रे,संजय कुवर,विनू शेठ, बापू गाठेकर,अण्णा शिंदे संतोष नागपुरे,सि.ओ नागेंद्र मुतकेकर,बि. डी.ओ अन्सार शेख, पी. आय नंदकुमार कदम, वैद्यकीय अधीक्षक शैलजा कुपास्वामी ,तहसीलदार आबा महाजन, टी एम ओ शरद कानकडे, डी एच ओ डॉ. हर्षल नेहते आदींसह नागरिक उपस्थित होते.
