
येवला : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी आज ता.येवला (भारम ) येथे आयोजित जनता दरबारात उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला व जनता दरबारात प्राप्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा,राशन कार्ड, कृषी विभाग व वीज वितारणांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेऊन या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली तसेच तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. सद्यस्थितीत 35 गावांना पाणीपुरवठा चालू असून जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी टँकर सुरू ठेवण्याचे निर्देश ही ह्या वेळी देण्यात आले.
मागील वर्षीच्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा आढावा घेत असताना प्रशासनाच्या अनेक त्रुटी निदर्शनास आल्या यापुढे आपण आपले जबाबदारी व्यवस्थित सांभाळा आपल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होऊ देऊ नका व अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांचे प्रशिक्षण वर्गाच्या आयोजन करून सर्व ग्रामसेवक प्रशिक्षित करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या कृषी विभागातल्या व अन्य सर्व विभागातल्या शेतकरी,विद्यार्थी, महिलांसाठीच्या योजना येथे लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचतील याच्या सूचना केल्या.यावेळी आनंद शिंदे ,राजुसिंग परदेशी, सुनील सोमसे,डॉ. नंदकुमार शिंदे,नानासाहेब लहरे, दत्ता सानप, गणेश गायकवाड, संतोष काटे, संतोष केंद्रे, कृष्णा कव्हात, योगेश व्यवहारे, संदीप मुरकुटे, बाळासाहेब सातारकर, छगन दिवटे, दत्तू सोमासे,सखाहरी लासुरे, अशोक देवरे,पद्माकर देशमुख, गौतम पगारेझ प्रमोद बोडके, वाल्मीक सोमासे,गोरखनाथ खैरनार,संजय पगारे, राजेंद्र मगर,हरिभाऊ पुणे तसेच अधिकारी वर्ग प्रांत हेमांगी पाटील, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी अन्सार शेख,मुख्य अधिकारी न.पा. येवला नागेंद्र मुटकेकर, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम,तालुका कृषी अधिकारी महेश जंगम, उपअभियंता पाटबंधारे जी. बी. राहटळ, आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे,स्थानक प्रमुख विकास व्हाहुळ, राज्य उत्पादक निरीक्षक विठ्ठल चौरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा कृपास्वामी आदिसह नागरीक उपस्थित होते.
