भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

0

नाशिक : शहरातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या या महापालिकेच्या शाळेतून शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरीब मुलां-मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. असंख्य अडचणींवर मात करून या शाळेच्या निर्मितीसाठी कष्ट करणाऱ्या नगरसेविका लता दिनकर पाटील व दिनकर पाटील यांच्यासह यात हातभार लावणाऱ्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाल्याचे समाधान डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले. शिवछत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन दिनकर अण्णा पाटील,लताबाई दिनकर पाटील, विष्णू नाना पाटील,अमोल दिनकर पाटील यांनी केले होते. आज देशातील सरकार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करण्यासाठी काम करते आणि त्याचाच एक भाग मी नक्की सांगेल की आज नवीन शैक्षणिक धोरण अवलंबले जात आहे जेणेकरून आपली पुढची पिढी अजून चांगली तज्ञांची घडो या संकल्पनेतून हे धोरण आणलंय असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार सिमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे,आमदार राहुलजी ढिकले, गिरीशजी पालवे, गणेश जी गीते,जगन अण्णा पाटील, शिवाजी चुंबळे, सुनीलजी बच्छाव, सुनीलजी केदार, प्रशांतजी जाधव, सुरेश आण्णा पाटील, भाऊसाहेब कडभाने, भाऊसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर काकड,रामहरी संभेराव,कुणाल वाघ, विजय साने,वर्षाताई भालेराव, माधुरी ताई बोरकर, रवींद्र भिवरे, भगवान दोंदे, श्याम बडदे, देविदास राठोड,सुनील केदार, संकेत बावनकुळे, नितीन गायकर,योगेश मैंद, नंदेश उमप सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here