जवखेडे खालसा येथे संत मारीया मंदिराचा ९ वा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) जवखेडे खालसा ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील आंधळे वस्ती वरील संत मारीया मंदिराचा नववा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला. फादर राजू शेळके यांनी समाज प्रबोधन केले. दिप प्रज्वलन,पवित्र मिस्सा,पवित्र माळवाचन, प्रभुभोजन,तांदूळ भाकरी आणि द्राक्ष रसाचे वाटप करण्यात आले.सुभाष जाधव यांनी पवित्र माळेचे वाचन केले. सोनवणे परिवारातील प्रेमा,रिना,स्मिता यांनी सामुदायिक गीत गायन केले.प्रिती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली. या प्रसंगी जवखेडे दुमालाचे सरपंच पती संपत कसोटे,उपसरपंच भास्कर नेहुल,जवखेडे सोसायटीचे संचालक आदिनाथ गीरी,विजय सोनवणे, अरविंद जाधव,विजय जाधव,आंतवन बोर्डे, अशोक दळवी, सागर दळवी, श्रीकांत हिवाळे,दर्शना सिस्टर लुशी,इत्यादी मांन्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र जाधव आणि सुभाष जाधव यांनी विषेश परिश्रम घेतले. नगर,नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील अनेक मांन्यवर या वेळी उपस्थित होते.गेल्या दोन वर्षापासून कोरोणा आजारामुळे या कार्यक्रमास खंड पडलेला होता तो आता सुरळीतपणे सुरू झालेला आहे.आभार अमोल जाधव यांनी मानले. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here